नागपूर:
कोविडनंतर पोल्ट्री उद्योगाला चांगलाच फटका बसला आहे, कधी पिलांचे दर तर कधी दाण्याचे भाव वाढतात, कधी कोंबडीला भाव मिळत नाही,तर कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी वातावरणीय बदलामुळे कोंबड्यांचा मृत्यू होतो, या सर्व पेचात पोल्ट्री फार्मर फसला असून त्याच्या मालाला मागील दोन ते तीन वर्षांपासून योग्य भाव मिळत नसल्याने पोल्ट्री फार्मर संकटात सापडला आहे.
याच विषयावर सरकारकडे पाठपुरवठा करण्यासाठी व पुढील रणनीती ठरविण्यासाठी शनिवार दिनांक ०४.०६.२०२२ ला दुपारी १२ ते ३ वाजता कुही येथे पोल्ट्री बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून रेणुका माता मंदिर मांडळ रोड, कुही येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मागील ३ वर्षांपासून कोंबडी तयार करण्यासाठी येणार खर्च देखील निघू शकत नसल्याने पोल्ट्री फार्मर अडचणीत सापडला आहे.
कृषिपूरक व्यवसाय असलेल्या फार्मिंगकडे सरकारचे लक्ष नसल्याने फार्मर डबघाईस आला आहे. तर इंटिग्रेशन कंपन्यांनी आपली मनमानी सुरु केल्याने कोंबड्यांना योग्य भाव मिळत नाही. याला विरोध करण्यासाठी आणि पोल्ट्री फार्मवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे कोणत्याची जिल्ह्यातील फार्मर या बैठकीला उपिस्थत राहू शकतो,
या बैठकीत जास्तीत जास्त संख्येने पोल्ट्री फार्मरने उपस्थित राहण्याची विनंती पोल्ट्री बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
0 Comments