Ticker

6/recent/ticker-posts

कोंबडीची धंदा म्हणजे चाऱ्याण्याची कोंबडी अन बाराण्याचा मसाला

अत्यंत गंभीर परिस्थितीत अडकलेला पोल्ट्री उद्याग का मागे जात आहे? त्याची करणे काय?
 हे तुम्हाला आणि सर्वांना माहित आहे. मात्र त्याचे जवळून कोणी चिंतन केले नाही. उदाहरणार्थ 3 रुपयाचा पेपर विकणाऱ्या वृत्तपात्र विक्रेता संघटनेची महाराष्ट्र राज्यात १ संघटना होऊ शकते. ज्यातून त्यांच्या मागण्या सरकार दरबारी ठेवल्या जातात. ५० रुपयाची दाढी,कटिंग करणाऱ्या नावी बांधवांची संघटना होऊ शकते,२०,३० रुपयाचा प्रवास ज्या ऑटोमधून करतो त्या ऑटो चालकांची राज्यव्यावी संघटना होऊ शकते. ट्रक डायव्हर,५ रुपयाच्या बोरीसाठी मेहनत करणाऱ्या हमाल बांधवांची संघटना ,इमारत बांधकाम मजूर,शिक्षक, ऑपरेटर, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, आणखी अन्य क्षेत्रात संघटना होऊ शकते त्यांच्या मागण्यांना न्याय मिळू शकते, पण वर्षाला करोडोची उलाढाल असलेल्या कोंबड्याच्या धंद्यातील पोल्ट्री फार्मरची साधी संघटना होऊ शकत नाही हे देशातील पोल्ट्री फार्मर शेतकऱ्यांना लाजवणारा बाब आहे, तितकीच शोकांतिका देखील आहे.
१ दिवस घरात पेपर आला नाही कि माहितीचा आधार जातो. मात्र पेपर वाले त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे यासाठी संघटना काढतात आणि सरकार दरबारी पाठपुरवठा करून त्या मागण्या पूर्ण करतात. हे असते एकीचे बळ, मात्र प्रत्येक महिन्यात लाखो करोडो रुपये डुबतात आणि फार्मर म्हणतो आमच्या कोंबड्यांना भाव मिळत नाही, म्हणून ओरडत बसतो, मागील कित्तेक दिवसांपासून सर्व कोंबड्यांच्या प्रजातीचे भाव पडलेले आहे, ब्रॉयलर कोंबडीला बनवायला किलो मागे जवळपास ९० रुपये खर्च येतो.

 आज कोंबडीची धंदा  म्हणजे चाऱ्याण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला असाच झाला आहे. कोविड  नंतर अनेक तरुण या व्यवसायाकडे वळताना दिसत आहे, प्रत्येकाला वाटते कि पोल्ट्री फार्म हा धंदा अत्यंत लाभकारी आहे, मोठ्या प्रमाणात यात फायदा असतो, याच अनुशंघाने तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आज या व्यवसायाकडे वळत चालला आह . मात्र व्यवसायात आल्यावर त्याला समजते  कि लाखोंची मेहनत  एका  महिन्यात कशी पाण्यात जाते.अनेक नवीन  फार्मर या व्यवसायात आल्याने फार्मिंग मोठ्या  प्रमाणात वाढली आहे त्यामुळे प्रोडक्शन एक्सएस होऊ लागले आहे.  
आज पोल्ट्री फार्म मधून ४० रुपयाला ट्रेडर्स खरेदी करत आहे, कॉकरेल कोंबडी १ किलो बनविण्यासाठी १४० रुपये खर्च येतो मात्र पोल्ट्री फार्म वरून विविध कारण सांगत ६५ ते ७० रुपयात खरेदी केली जात आहे, म्हणजे ब्रॉयलर कोंबडीमागे शुद्ध घाटा ५० रुपये प्रति किलो, आणि कॉकरेल कोंबडी मागे ७० ते ७५ रुपये प्रति किलो घाटा आज पोल्ट्री फार्मरला सहान करावा लागत आहे,मात्र त्याच उलट ग्राहकांसाठी कोबडीचे भाव मात्र कमी झाले नाही. ते कोंबडीचे भाव वाढल्यावर वाढतात मात्र कमी झाल्यावर कमी होत नाही. 
विदर्भात जेव्हापासून कॉकरेल प्रजातीची कोंबडी विक्रीसाठी आली तेव्हा पासून गावरान कोंबडीची मागणी घटली. त्याच मुख्य कारण म्हणजे कॉकरेलचे लागत शुल्क कमी येणे, आणि दुसरे कृत्रिमरीत्या गावरांची आणि कोकरेलची टेस्ट कंप्यारीझन करून डिमांड पाडण्यात आली, आणि हि सर्व डिमांड कॉकरेल मार्केट वाढविण्यासाठी वळविण्यात आली.
याचा सर्व फटका पश्चिम महाराष्ट्रात, आणि मराठवाड्यात असेलल्या गावरान अंडीऊबवणी केंद्रांना बसला. आठवड्याला लाखो पिल्ली तयार करणाऱ्या केंद्रांना आज विदर्भातील पिल्ले विक्रेत्यांना फोन करून पिल्ली पाहिजे का ? असं म्हणून फोन करावे लागत आहे. मुख्य म्हणजे कॉकरेल नवीन जात असल्याने आणि तिची डिमांड वाढू लागल्याने फार्मर आपोआप कॉकरेल फार्मिंगकडे कन्व्हर्ट होत गेला.आता कॉकरेलची फार्मिंग वाढू लागली आणि मालाचे भाव पडू लागले. आता फार्मर ओरडू लागला कि आमच्या मालाला भाव मिळत नाही. 
मागील अनेक वर्षांपासून फार्मर मालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून ओरडत आहे ओरडत ओरडत घसा कोरडा झाला आवाज बसला मात्र सर्व यंत्रणा चिडी चूप पणे फार्मरचा तमाशा बघत चूप बसली आहे,आणिका नाही बसणार?कारण तुमचा आवाज त्यांच्या पर्यंत अजूनही पोहचला नाही. कारण तुमच्यात एकी नाही, आणि जो पर्यंत एकी होणार नाही तो पर्यंत सर्व तुम्हाला निचोडून खात बसणार आणि आम्ही फार्मर असेच चूप बसणार.
तुम्हाला सहजा सहजी भाव कोणी देणार नाही. असं कधी होत नाही, प्रत्येक गोष्टीचा पाठपुरवठा करावा लागतो.भाव सहजासहजी मिळत नसतो तो मागावा लागतो, कोणी आपला सासरा नाही कि त्याची पोरगी सुखी राहिली पाहिजे म्हणून तुम्हाला आयता आणून देणार? इथं आपले सख्खे आपले नाही होत, तर सरकार कशाला कोणाला इतका भाव देणार! आपल्या धंदा सरकारला कोणता टॅक्स देतो? कि सरकार आमच्या धंद्यात डोकं खुपसून बसेल.आणि म्हणेल बाबांनो या इकडे तुम्ही आम्हाला इतके लाखकरोड टॅक्सच्या माध्यमातून दिले त्यामुळे आम्ही तुमची कोंबडी २०० रुपये किलो विकण्यास सहकार्य करू! आणखी भरपूर उदाहरण आहेत जे मी आज लिहून तुम्हाला सांगू शकत नाही, आणि इतर लोक फार्मरच्या मागे किती डोक खराब करणार? 
कधी तरी मार्केटची प्लेसमेंट वाढणार आणि कमी देखील होणार, मात्र जास्त करून कोविडच्या नंतर फार्मर घाट्यात जात आहे, त्यात इंटिग्रेशन कंपन्या जितक्या दोषी आहेत. तितक्याच आपला फार्मर देखील चुकीचा आहे, मार्केटचा अंदाज न घेता मालाची प्लेसमेंट करतो, आणि नंतर ट्रेडरला दोष देतो, ट्रेडर तुमचा दुश्मन नाही. तो आज रात्री गाडी भरतो सकाळी खाली करतो आणि त्यातून फुल नाही फुलाची पाकळी कमवितो. मात्र तुम्ही ३ महिने राब राब राबून तुमच्या हातात फक्त "कोंबडीची चिचडी" येत असेल तर तुम्ही कुठे तरी चुकत आहेत, हे फार्मर ने लक्षात घायला पाहिजे,
 आज सर्वजण स्वतःला शाहने समजत आहे, मात्र अतिशहाणपणा हा तुमच्याच आतील परिस्थिला कारणीभूत असणार आहे. जे सध्या सुरु आहे. हे त्याचेच परिणाम आहे.आज इंटिग्रेशन कंपन्यावर कोणाचा वचक नाही. त्यांना वाटते तितकी मालाची प्लेसमेंट करण्याची मुभा आहे, त्याचसोबत मोठ्या लोकांच्या छत्रछायेखाली ते वावरत आहेत, ते स्वतःच माल स्वतः विकतात. मात्र हाच फटका तुमच्या आमच्या सारख्या फार्मरला बसतो. त्याचे कारण म्हणजे जे प्रायव्हेट फार्मर आहेत त्याच्या तोंडातला घास हिरावून स्वतः कंपन्या प्लेसमेंट करतात. 

कंपन्या त्यामुळे माल जास्तीचा तयार होतो.आणि त्याचा फटका सामान्य ओपन फार्मरला बसतो, आज या कंपन्यांवर बंधन टाकणे गरजेचे आहे हे बंधन जोपर्यंत या कंपन्यांवर लागणार नाही तोपर्यंत संपूर्ण मार्केट हा या इंटिग्रेशन कंपन्यांच्या हातात चालला जाणार आहे.फार्मिंग ही शेतकऱ्यांसाठी कृषी पूरक व्यवसाय म्हणून सुरू करण्यात आली होती. मात्र आज याला कमर्शियल मार्गातून कंपन्यांनी आपला दाबलेला हात फार्मरवर कायम ठेवला आहे.आता वेळ आहे ती फार्मरला जागे होण्याची कारण कंपन्या आपले पाय पसरू लागले आहेत. 

यांना आज थांबवलं नाही तर उद्या तुम्ही त्याच फार्ममध्ये कुटार,तुराट्या, आणि भाजीपाला ठेवण्यासाठी कामात आणावा लागेल. जिथे तुम्ही आज पोल्ट्री फार्मिंग च्या उद्देशाने लाखो करोडो रुपये इन्वेस्ट केलेले आहेत तिथं तुम्ही भाजीपाला ठेवाल . आज एका नावाजलेल्या कंपनीला राज्यातील एका इंग्रजी वृत्तपत्रात कोंबडी विक्रीसाठी 80 रुपये किलो जिवंत कोंबडी या मथळ्याखाली जाहिरात द्यावी लागते , म्हणजे त्या कंपनीला किती कोटी रुपयाचा घाटा झाला असेल ? कि त्यांना पेपरमध्ये जाहिरात द्यावी लागली. त्यात जितके कोटींचा त्यांना घाटा झाला असेल त्यापेक्षा कित्तेक कोटी ने ते फायद्यात आहेत प्रश्न हा नाही , प्रश्न हा आहे कि कोंबड्या विक्रीसाठी पेपर मध्ये जाहिरात येणे म्हणजे मार्केटची पोजिशन काय असेल?इतकी मंदी आली असेल कि त्यांना पेपरमध्ये जाहिरात देऊन कोंबड्या विकाव्या लागत आहे. 
असो यात हे मात्र नक्की कि कंपन्यांवर अशी वेळ येन म्हणजे इतर कंपन्यात रस्सीखेच स्पर्धा सुरु असणे आणि त्याचा फटका हा सर्वसामान्य फार्मरला बसने हाच यातून निष्कर्ष निघतो.जाहिरात देऊन या कंपनीने फार्मरला आणि ग्राहकांनी काय मेसेज द्यावा? हे फक्त फार्मर समजू शकतात मात्र ग्राहकांना याचा अनुभव नसल्यामुळे ते या भानगडीत पडणार नाही. सर्वसाधारण ग्राहकांना हि कंपनीची जाहिरात करण्यासाठी हा फंडा कंपनीने आजमावलेला असेल असच वाटणार. 
मात्र कंपनीने ज्या पद्धतीने जाहिरात दिली त्याचा स्पष्ट संदेश जातो की कंपनीकडे बराचसा माल हा विक्रीसाठी उपलब्ध आहे,पडित भावामुळे हा मार्केटमध्ये फसला. बाजारात असलेल्या इंटिग्रेशन कंपन्यांच्या आपापसातील कॉम्पिटिशनमुळे हा माल पाहिजे त्या प्रमाणात विकला जाऊ शकत नाही. कारण कोणती कंपनी मोठी हे ठरवण्यासाठी यांनी आपापसात कॉम्पिटिशन सुरू केले आहे. यात आपल्या भागात ६ ते ७ कंपन्या आहेत ज्या इंटिग्रेशन तत्वावर काम करतात. 
त्यांनी फार्मरला विश्वासात न घेता भाव ठरवलं सुरू केलं. या इंटिग्रेशन कंपन्यांचा तुम्ही जवळून अभ्यास केला तर तुम्हाला समजून येणार की त्यांच्या कॉस्टिंग आणि ओपन फार्मिंगच्या कॉस्टिगमध्ये जमीन आसमानचा अंतर येतो. त्यामुळे तुम्ही त्या कॉस्टिंगला आधारभूत धरून का माल विकावा?असा सर्वसाधारण फार्मरचा पहिला प्रश्न उपस्थित होतो. मात्र फार्मर अजून पर्यंत झोपलेला आहे. हे दिसून येत नाही आहे की तो या कंपन्यांच्यामुळे हा डुबत चाललेला आहे.
 मार्केटमध्ये आज पाच ते सात कंपन्या कोंबड्यांचे भाव ठरवतात आणि स्वतः मालाची विक्री करतात. मात्र ह्यांच्या मालाच्या विक्री करण्याच्या किमतीत आणि तुमच्या कोंबडी तयार करण्याच्या किंमतीत देखील वीस रुपयाचा फरक आढळून येतो. त्यामुळे तुम्ही का बरं यांच्या किमतीत माल विकावा? जोपर्यंत स्वतः आपण या विरोधात आवाज उतरणार नाही तोपर्यंत तुमचं अस्तित्व संपलेले असणार आणि ओपन फार्मिंग ही जमीन उध्वस्त झालेली असेल. त्यामुळे आज सांगण्याचा उद्देश आणि हे लिहिण्याचे तात्पर्य फक्त इतकेच आहे की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या नियमानुसार शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्रिसूत्री नियम जोपर्यंत तुम्ही तुमच्या अंगात अमलात आणणार नाही,
तोपर्यंत तुम्ही आज कितीही मोठे असाल तरी या रेट बुडीच्या दुष्काळातून या गरिबीतून या टेन्शन मधून बाहेर निघणार नाही. आजही वेळ आहे निर्णय घ्या, ह्याच्या त्याच्याकडे हात पसरवू नका...स्वताच्या मनाला विचारा आपण असं किती वर्ष सहन करणार ?किती कर्ज करणार ? किती हात पसरवणार?आणखी किती लाखाने बुडणार? विचार करा आणि निर्णय घ्या...आम्ही असेच लिहीत राहू तुम्हाला समजावत राहू तुम्ही चासेच मूग गिळून चूप बसणार हे हे तितकेच सत्य आहे.., आणि म्हणून सध्या स्थितीत कोंबडी
चा  धंदा म्हणजे चाऱ्याण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला असाच झाला आहे  .......                                           .धन्यवाद.
                           
   लेखक हे पत्रकार असून 
                 पोल्ट्री अभ्यासक आहेत.

 
Share This

Post a Comment

0 Comments