कुक्कुटपालन शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी अमरावती येथे शेतकरी बचाव मोहिमेच्या माध्यमातून पोल्ट्रीफार्मर बंधूसाठी अमरावती जिल्हा पोल्ट्री योद्धा संघटनेच्या माध्यमातून सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अमरावती तसेच अनेक तालुक्यातील पोल्ट्री फार्मर शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.
पोल्ट्री व्यावसायिकाच्या समस्या दूर व्हाव्यात,त्याला त्याच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळावा.करार कंपन्यांची दादागिरी बंद व्हावी, इंग्रजीत होणारे अग्रीमेंट बंद व्हावे, तसेच पोल्ट्री इंटिग्रेशन कमी होऊन ओपन पोल्ट्री फार्मिंगला चालना मिळावी, वाढत्या महागाई सोबत ग्रोविंगचार्ज वाढावा, इंटिग्रेशन कंपन्यांकडून कोंबड्यांच्या दरात होणारी परस्पर दरवाढ थांबावी,त्याच सोबत पोल्ट्री फार्मरच्या समस्या दूर व्हाव्यात ,यासह अनेक मागण्यासाठी आज अमरावतीत महाराष्ट्र पोल्टी योद्धा को. प.सोसायटी ली. रायगड यांचे मार्फत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अनेक पोल्ट्री फार्मर शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शविली. यावेळी महाराष्ट्र पोल्टी योद्धा को. ऑप.सोसायटी ली. रायगडचे अध्यक्ष अनिलजी खामकर,सचिव विलासजी साळवी, तसेच विदर्भातील ११ जिल्ह्यातील उपाध्यक्ष,कार्याध्यक्ष,जिल्हा संचालक, तसेच अमरावतील शेकडो पोल्ट्रीफार्मर उपस्थित होते.
या संघटनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळावी तसेच शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबावा, असा आहे
0 Comments